Click to Watch in HD > नवी मुंबई मेट्रोच्या कामाला गती – मे 2019पर्यंत पहिल्या टप्प्यातील सेवा सुरु

Watch नवी मुंबई मेट्रोच्या कामाला गती – मे 2019पर्यंत पहिल्या टप्प्यातील सेवा सुरु होण्याची शक्यता सिडकोचा महत्वकांक्षी प्रकल्प समजल्या जाणाऱ्या नवी मुंबई मेट्रोच्या कामाला गती देण्यात आली आहे . याअंतर्गत स्थानकाची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. डेपो,कंट्रोल रूमचे काम पूर्ण झाले असून इतर प्रलंबित कामे ही हाती घेतली जाणार आहेत अशी माहिती या प्रकल्पातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. सिडकोने मे 2011 मध्ये नवी मुंबई मेट्रोच्या कामाला सुरुवात केली . बेलापूर ते पेंधर या 11 किमी अंतरावर सुरू केलेला प्रकल्प डिसेंबर 2014 मध्ये पूर्णत्वास आणण्याचे प्रास्ताविक होते परंतु आर्थिक कारणांमुळे कामे रखड्ल्याचे बोलले जात आहे दरम्यान आता नवी मुंबई मेट्रोच्या कामांनी वेग घेतला असून मे 2019 पर्यंत पहिल्या टप्प्यातील मेट्रो सेवा सुरू होईल असे संकेत सूत्रांनी दिलेत

  • 1
    Loading